Back to recipes
डाळ तांदूळाचा ढोकळा/तांदूळ व चणा डाळ ढोकळा
Serves 1
instagram.com
डाळ तांदूळाचा ढोकळा/तांदूळ व चणा डाळ ढोकळा
instagram.com
Serves 1
Save
Share
Export
Edit
Directions
1
एका बाउलमध्ये १ ग्लास रेशनचे तांदूळ, १/२ ग्लास चणाडाळ आणि १/४ ग्लास पोहे घ्या.
2
दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन ५-६ तास भिजत ठेवा.
3
५-६ तासांनंतर पाणी काढून टाका.
4
भिजलेले तांदूळ आणि डाळ मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात १ वाटी आंबट दही घालून बारीक वाटून घ्या.
5
वाटलेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्या.
6
त्यामध्ये १/४ चमचा हळद आणि १/२ चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
7
पीठ ८-१० तास फर्मेंट होण्यासाठी ठेऊन द्या.
8
ढोकळा बनवण्यासाठी १० इंच ताट वापरलेले आहे, त्या ताटाला तेल लावून घ्या.
9
एका मोठ्या कुकरमध्ये स्टँड ठेवून त्यात पाणी घाला आणि गरम करण्यासाठी झाकून ठेवा.
10
फर्मेंट झालेले पीठ ढवळून घ्या.
11
पीठ जर खूप घट्ट असेल तर थोडे पाणी टाकून पातळ करून घ्या.
12
त्यात २ Tbsp तेल टाकून मिक्स करून घ्या.
13
शेवटी १/२ चमचा सोडा टाकून त्यावरती एक चमचा पाणी टाका आणि पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या.
14
तेल लावलेल्या ताटामध्ये ढोकळ्याचे मिश्रण टाकून १५ ते २० मिनिटे वाफवून घ्या.
15
चाकूने चेक करा की ढोकळा शिजला आहे की नाही.
16
ढोकळा थंड करून त्यावर मोहरी, मिरची, कढीपत्ता, हिंग याचा तडका टाकून घ्या.
17
रेशनचे तांदूळ आणि चणा डाळीपासून कापसासारखा मऊ लुसलुशीत ढोकळा तयार झालेला आहे.
Ingredients
1 ग्लास रेशनचे तांदूळ
0.5 ग्लास चणा डाळ
0.25 ग्लास पोहे
1 वाटी आंबट दही
0.25 चमचा हळद
0.5 चमचा मीठ
1 चमचा पाणी
2 Tbsp तेल
0.5 चमचा सोडा
Equipment
बाउल
मिक्सर ग्राइंडर
झाकण
चमचा
स्टील प्लेट
ब्रश
मोठा कुकर
चाकू
Tips
पीठ खूप घट्ट असेल तर थोडे पाणी घालून पातळ करून घ्या.
ढोकळा थंड करून त्यावर मोहरी, मिरची, कढीपत्ता, हिंग याचा तडका टाकून घ्या.
Related recipes
More Indian recipes →
More Breakfast recipes →
Paneer Paratha
Indian · Breakfast
Ven Pongal
Indian · Breakfast
Eggless shakshuka with a desi twist
Indian · Breakfast
Folded Brekky Egg
Indian · Breakfast
High Protein Oats Smoothie
Indian · Breakfast
Stuffed Idli
Indian · Breakfast
馬鈴薯烘蛋 (Potato Omelette)
Indian · Breakfast
Egg Pizza Sandwich
Indian · Breakfast
Vegan Breakfast Sandwich
Indian · Breakfast
Ekadashi Potato Pancake
Indian · Breakfast
برطمان الشوفان والبروتين
Indian · Breakfast
High protein red lentil buns
Indian · Breakfast
25m